29 March 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

TET घोटाळ्यात सत्तार अडचणीत?, तपास ईडीकडे | समर्थन काढू नये म्हणून बंडखोरांविरोधात शिंदे-फडणवीसांच्या फिल्डिंगची चर्चा

Maharashtra TET Scam

Maharashtra TET Scam| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय पेच सध्या कोर्टात आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहिला आहे. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असेलले शिवसेनेचे बंडखोर ४० आमदार शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे, TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने आज सत्तार पुन्हा चर्चेत आलेत.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यात अब्दुल सत्तार पाहिले नेते, त्यामुळे मराठवाड्यातील सेना आमदार खासदार बंडखोरीकडे ओढले अशी चर्चा आहे. TET घोटाळ्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली.या सर्व आरोपांन अब्दुल सत्तार यांनी लगेच नकार दिला.

सत्तार यांच्या मार्गात काटे कोणी टाकले?
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 60:40 फॉर्म्युला ठरल्याने शिंदे गटाला 16 किंवा 17 मंत्री पद मिळणार आहेत. 50 जणांमध्ये 17 मंत्री पद विभागणे शिंदे यांच्यासाठीही अडचणीचे आहे. 17 जणांमध्ये आपले नाव लागावे यासाठी धडपड सुरू आहे. सर्वच बंडखोर मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 5 बंडखोर आहेत. या 5 जणांमधून केवळ दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सत्तार यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रबळ दावा असल्यानेच नेमकी आज लिस्ट आली आणि लिस्ट मध्ये सत्तार यांच्या चार अपत्यांची नावही आली. हा योगायोग नाही. सत्तार यांच्या मार्गात काटे टाकण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद मधून मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, संदीपान भुमरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. जिल्ह्याला दोन मंत्रिपद आणि पालकमंत्री मिळणार आहे. स्पर्धेत तिघे असल्याने एकाचा पत्ता कापणे आवश्यक आहे, जेणेकरून इतरांचे मंत्रिपद पक्के होईल. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या चार अपत्यांची नाव आली, त्याचा तपास होईल, सत्य बाहेर येईल…तुर्तास या चर्चा आणि लिस्ट मुळे अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य मंत्री पदाला ग्रहण लागू शकते.

अंबादास दानवे काय म्हणाले :
अंबादास दानवे म्हणाले ”अब्दुल सत्तार हे राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांच्या दोन मुलींची नावे समोर आली आहेत. 7,800 हून अधिक जण TET घोटाळ्यात सहभागी होते आणि या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. आता या घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावे समोर आल्याने आमची मागणी आहे की या संपूर्ण घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांची काही भूमिका आहे का याची चौकशी व्हावी. अंबादास दानवे पुढे म्हणाले ”सत्तेत असताना हा प्रकार घडला असल्याने हा गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, याच्या तपासासाठी शिवसेना आवाज उठवेल.’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra TET Scam MLA Abdul Sattar on political radar check details 08 August 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra TET Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x