बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मा.श्री धनंजय मुंडे साहेब (कॅबिनेट मंत्री ) यांचा आज शनिवार दिनांक 4 जानेवारी 2020 रोजीचा दौरा
दुपारपर्यत – बीड येथे राखीव
त्यानंतर धुळे जिल्हा दौरा
दु. – 4.30 वा. – होळेनाथ ता. शिरपूर सभा
*सायं – 6 वा. – विखरण ता.शिरपूर सभा
रात्रौ -8 वा. बेटावद ता. शिंदखेडा सभा
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2020
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज फक्त मतदान पार पडणार आहे. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे निकाल १३ जानेवारीपर्यंत राखून ठेवला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेतली. बीडमध्येही महाविकास आघाडी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.
राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020
Web Title: BJP Leader Pankaja Munde concedes defeat in BJP Beed ZP President Election.
