1 May 2025 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

राज्यात 23 मराठा संघटना काम करतात, मग भूमिका वेगळी का? | भाजप नेत्यांनी संभाजीराजेंना घेरलं

BJP leader Radhakrushna Vikhe Patil

नाशिक, ०७ जून | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत मराठा संघटनांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे.

अशावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व मराठा संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी आज (७ जून) लोणी इथं माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण बैठका घेत असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. या बैठकांमध्ये मराठा आंदोलनाच्या भविष्यातील रणनितीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन आपण करत असल्याचं विखे-पाटील म्हणाले. खासदार संभाजीराजे आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात 23 संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

 

News English Summary: Politics in the state is hot on the issue of Maratha reservation. It is learned that Chief Minister Uddhav Thackeray will meet Prime Minister Narendra Modi in Delhi tomorrow (June 8). On the other hand, the leaders of the Bharatiya Janata Party have also taken an aggressive stance and built their strength behind the Maratha organizations.

News English Title: BJP leader Radhakrushna Vikhe Patil questioned to to Sambhajiraje news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या