सांगलीत राजकीय भूकंप होणार? | चंद्रकांतदादांवर नाराज भाजप खासदार जयंतरावांच्या कार्यक्रमात

सांगली, १५ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षीय कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, सदर बैठकीला भाजपचे खासदार असूनही संजयकाका पाटील या कार्यक्रमात गैरहजर होते. दुसरीकडे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते, परंतु खासदारांच्या गैरहजेरीने अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु बैठक संपतेवेळी खासदार संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले, तेव्हा चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते, खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटांच बाहेर आले. मात्र संजयकाकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे जाणवत होता.
चर्चेतून बाहेर पडल्यानंतर कोणाशीही काहीच संवाद न करता संजयकाका गाडीत जाऊन बसले. एवढंच नाही तर गाडीत बसताना दरवाजा जोरात बंद करण्यात आला, त्यावेळी तो आवाज खूप काही सूचित करणारा होता. लगेच एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ धावत आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला. मात्र तरी देखील खासदार थांबले नाहीत, त्यांनी तिथून निघून जाणं पसंत केले.
मागील काही दिवसांपासून सांगलीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार आग्रही होते. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे अशी भूमिका घेत माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी संजयकाका पाटील यांची मागणी होती, पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदलाचा निर्णय लोंबकळत ठेवल्याचा राग खासदारांना आला. पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार संतापले असावेत, अशी शक्यता उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्याच्यावेळी संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात, हे काही कार्यक्रमांचे निमित्ताने आढळले आहे. या अगोदरही जयंत पाटील आणि संजयकाका पाटील एका बंद खोलीतून चर्चा करून एकत्र बाहेर पडल्याचे दिसले होते.
सदर कार्यक्रमावेळी संजयकाका ‘नको नको’ म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना आपल्या जवळ बसवून पंधरा मिनिटे चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक केले जात आहेत. भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित न राहणारे संजयकाका सांगलीतील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या मांडीला माडी लावून बसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’च्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर झालेली भेट नवी राजकीय समीकरणं तर निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. कारण तत्पूर्वी देखील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्यात संजयकाका हे अनुपस्थित होते.
News English Summary: Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil was in Sangli on the occasion of the party function. Sanjay Kaka Patil was absent from the meeting despite being a BJP MP. On the other hand, MLA Sudhir Gadgil, Suresh Khade and many other office bearers were present in the meeting, but the absence of MPs raised doubts in the minds of many. But at the end of the meeting, when MP Sanjaykaka Patil came to the meeting place, Chandrakant Patil had gone to the President’s bungalow for a change of office. But anger was clearly felt on Sanjay Kaka’s face.
News English Title: BJP MP Sanjaykaka Patil not happy in BJP may join NCP party news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL