2 May 2025 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

केंद्रानेच त्यांचं कौतुक केलंय | उद्धव ठाकरे आता एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत - भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी

BJP MP Subramanian Swamy

मुंबई, ११ मे | भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. मात्र सुप्रीम कोर्ट आणि केंद्राने देखील उद्धव ठाकरे आणि मुंबई महागरपालिकेच्या कामाचं आणि उत्तम नियोजनाचं कौतुक केलं आहे हे वास्तव आहे.

त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर नियोजनाची पोचपावती देताना केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे की, “सेंट्रलाइझ बेड वाटप, ऑक्सिजन साठवणुकीची सोय, प्रायव्हेट इस्पितळातही बेडचे वाटप, देखरेखीसाठी डॅशबोर्ड, रूग्णांसाठी पाठपुरावा करणे. प्रेरणादायक कोविड नियोजन केल्याबद्दल मुंबई मॉडेल, बीएमसी आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन’ असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता मुंबई आणि महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अनेक स्तरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेला शाबासकीची थाप मिळाली आहे. दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंची स्तुती केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय की, “मोदींच्या आणि आज केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई कोरोनाव्हायरस धोक्यातून निसटल्याबद्दल कौतुक केले. आता असे दिसते की उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. मी हे पहिल्यांदा देखील बोललो होतो आणि त्यानंतर अंध आणि गंध भक्त आरडाओरड करू लागेल होते. ते आता कुठे आहेत? पुन्हा शहरातील गटारात?”.

 

News English Summary: Judging by Modi’s, and today Union Government Spokesperson’s praise for Mumbai’s tackling of Coronavirus menace, it seems UT has become a model CM. This is what I said first and then Andh & Gandh Bhakts howled like frightened jackals. Where are they now? Back to city sewer? said BJP MP Subramanian Swamy

News English Title: BJP MP Subramanian Swamy appreciate CM Uddhav Thackeray over dealing state corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या