2 May 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell?
x

देशात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेणं शक्य नाही : मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत

औरंगाबाद : आज स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केलं आहे. जर त्या एकत्र घ्यायच्या असतील तर ते कायदेमंडळाने ठरवले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी कायदेमंडळाला राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल आणि लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे असं भूमिका मांडली. तसेच कायदेमंडळातून राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे वस्तुस्थितीला गृहीत धरूनच या दोन्ही निवडणुका एकत्र घेणे शक्य नसल्याचं ओ. पी. रावत यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासंबंधितच्या बातम्या आणि चर्चांना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनीच पूर्ण विराम दिला आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x