28 March 2023 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

भाजपची नवी केंद्रीय टीम | पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी

BJP Maharashtra, Central team, Pankaja Munde, Vinod Tawde

मुंबई, 26 सप्टेंबर : भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.

फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली नव्हती. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींनंतर भाजपाची राज्यातील सत्ता गेल्याने आता पक्ष त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवतो याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या नेत्यांचे लक्ष लागले होते.

भाजपची राज्य कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारीणी जाहीर केली होती. या कार्यकारणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले होते.

 

News English Summary: BJP has announced its new central team. This has given an opportunity to the leaders of Maharashtra. BJP national president J.P. Nadda announced the names of BJP central officials. Pankaja Munde, Vinod Tawde and Vijaya Rahatkar have been given a chance. MP Poonam Mahajan has been left out.

News English Title: BJP new central team Pankaja Munde and Vinod Tawde selected Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x