3 May 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मनसेनंतर भाजप नेत्यांच्या इंदुरीकर महाराजांसोबत भेटीगाठी

BJP Radhakrishna Vikhe Patil, Indurikar Maharaj, Sangmner

संगमनेर, २५ जुलै : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अभिजित पानसे इंदोरीकर महाराजांच्या भेटीला पोहोचल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.

अभिजित पानसे यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर गावी इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी अभिजित पानसे आणि इंदुरीकर महाराज यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली होती. ‘एखाद्या छोट्या वाक्यावरून इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. इंदुरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे आहे. अनथा मुलांसाठी शाळा चालवत आहे, समाज प्रबोधनाच मोठं काम विसरून चालेल का?’ असा सवाल यावेळी अभिजित पानसे यांनी उपस्थितीत केला होता.

त्यानंतर आज भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली. विखे पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे नेते, भाजपा नेत्यां पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज इंदुरीकरांची त्यांच्या ओझर गावातील निवासस्थानी भेट घेतली. इंदोरीकर महाराजांचे समाजप्रबोधनाचे मोठे काम असून त्यांनी आपले काम पुढेही अविरतपणे सुरू ठेवावे. समाज आणि माझे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर विखे पाटलांनी घणाघाती टीका केली आहे. ‘ आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणी जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे. दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका असून आपल्या दुधसंघातून मलीदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत.’ असा आरोपही विखे पाटलांनी केला.

 

News English Summary: Later today, BJP leader Radhakrishna Vikhe Patil met Indurikar Maharaj. Vikhe Patil has expressed support to Indurikar Maharaj. Following MNS leader and BJP leader, Radhakrishna Vikhe Patil met Indurikar at his residence in Ojhar village today.

News English Title: BJP Radhakrishna Vikhe Patil met Indurikar Maharaj at Sangmner News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या