3 May 2025 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

पूरग्रस्त संकटातून बाहेर आले नसताना फडणवीसांच्या 'महा इव्हेन्ट' यात्रा सुरु होणार

Devendra Fadnvis, CM Devendra Fadnvis, Chief Minister Devendra Fadnvis, sangali Flood, Kolhapur Flood, Mahajanadesh yatra

नागपूर : कोल्हापूर, सांगलीतील पूर आता ओसरू लागला असला, तरी तेथील जनजीवन अजून पूर्ववत झालेले नाही. पुराच्या पाण्यासोबत शेकडो संसार वाहून गेले आहेत. अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे, शैक्षणिक साहित्य यांची वाताहत झाली आहे. प्रसारमाध्यमांतून दाखवले जाणारे भीषण वास्तव पाहून मुंबईकरही हेलावला आहे. म्हणूनच मुंबईच्या विविध भागांतून गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, समूह, विद्यार्थी संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.

सार्वजनिक गणपतींच्या आगमनावर दरवर्षी हजारो रुपये खर्च केले जातात. मात्र हा खर्च वाचवला तर कित्येकांचे संसार पुन्हा उभे राहू शकतात. हीच जाणीव जोपासत फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशाचे स्वागत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती वाजतगाजत न आणता तोंडी जयजयकार करत आणला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला. या महापुरामुळे हजारो लोकांचे संसार देशोधडीला लागले. अनेकांच्या संसाराचा गाडा पाच ते दहा वर्षांनी मागे गेला. या परिस्थितीत पिडीतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. मात्र या आपत्तीत प्रशासन आणि सरकार काही प्रमाणात मागे राहिलं अशी ओरड होत आहे. ‘ये नया इंडिया है’, पण हे वाक्य चित्रपटापुरतच राहिलं का, अस वाटत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरात अनेकांना जीव गमवावा लागला. तर हजारो लोकांच्या संसाराची वाताहत झाली. पुरग्रस्तांना सरकारकडून १५४ कोटी रुपये मदत जाहीर करण्यात आली. यानुसार कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. ही मदत फारच तोकडी आहे. याउलट २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी याच सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. भक्तीसाठी सरकार अडीच हजार कोटींचा निधी देते, मात्र पुरग्रस्तांचे विस्थापित झालेले संसार उभारण्यासाठी केवळ १५४ कोटी रुपये, नव्या भारतात पूरग्रस्तांसोबत असा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित होतो.

एकाबाजूला अशी परिस्थिती असताना आणि कोल्हापूर सांगलीतील जलप्रलयापुर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा काढली होती. आता या दोन्ही जिल्ह्यावरची जल आपत्ती टळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. १७ ऑगस्टपासून महाजानादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. पहिला टप्पा विदर्भात झाला. आता दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून यात्रा सुरू होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. १८ रोजी त्यांच्या अकोले व संगमनेरला सभा होणार असून, याच दिवशी राहुरी व नगरला स्वागत समारंभ होणार आहेत व १९ रोजी पाथर्डी, आष्टी व जामखेड येथे सभा घेऊन फडणवीस बीडकडे जाणार आहेत. भाजपकडून या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात यात्रा ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात आलेला महापूर आता ओसरला आहे. मात्र नागरिक अजूनही अन्न, वस्त्र निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत पुरवली जात आहे. तर काही सेवाभावी संस्थांनी देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. तर अनेक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या