मुंबई: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या तारखा देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील अखेरच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
सरकारच्या या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेटची बैठक घेतली. जाता जाता फडणवीस सरकारने एक-दोन नव्हे तर ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी त्यांच्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करणे, कुष्ठरोग पीडितांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणे, दिव्यांगासाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वॉटर ग्रीडला मंजुरी, बचतगटांना कुक्कुटपालनासाठी निधी आदी महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील
वॉटर ग्रीडसाठी 3122 कोटी pic.twitter.com/QU6dqgerJF— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 9, 2019
