18 September 2021 10:08 PM
अँप डाउनलोड

शिवसेनेचे आढळराव पाटील मदतीसाठी मनसेच्या कार्यालयात? वसंत मोरे म्हणतात 'शेवटी आदेश राजसाहेबांचा

Shivsena, Adhalrao Patil, MNS, Vasant More

हडपसर : शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये विळा-भोपळ्याचे नाते असले तरी उमेदवार मदतीची चाचपणी करण्याचे सर्व प्रकार अजमावून बघतात आणि तसाच काहीसा प्रकार शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा क्षेत्रात घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा क्षेत्रात चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. त्याचाच प्रत्यय याभेटीनंतर आला आहे असंच म्हणावं लागेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिरूर लोकसभा क्षेत्रातील निवडणूक यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना सोपी राहिलेली नाही. त्यांच्यासमोर डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा सुप्रसिद्ध असलेला उमेदवार राष्ट्र्वादीने दिल्याने त्यांना देखील चांगलाच घाम फुटला आहे. त्यात राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा जोडीला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला उघड पाठिंबा दिल्याने मनसेचे प्राबल्य असलेले मतदासंघ हुकमीऐक्याचे काम करणार आहे. त्यामुळे सदीच्छा भेटीच्या नावाने आढळराव पाटील थेट मनसेचे हडपसर विधानसभा क्षेत्रातील तगडे नगरसेवक वसंत मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले.

परंतु, चर्चा तर होणारच असं म्हटल्यावर वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकत म्हटलं आहे की, “आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्यच आहे आज मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (दादा) यांनी राहत्या घरी भेट दिली शेवटी आदेश मा.राजसाहेबांचा”. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे लोकसभेतील महत्व अधोरेखित होतं आहे.

काय आहे नेमकी पोस्ट?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(707)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x