30 April 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

दसरा मेळाव्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून एक ट्विट केलं आणि नेटिझन्सनी केला डिजिटल सत्कार

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकाच दिवशी मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत. यातला एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत आले आहेत.

दरम्यान, पुण्यातून मुंबईच्या बीकेसी मैदानावर निघालेल्या कार्यकर्त्यांना आपण कुठे चाललो आहोत हे माहितीच नसल्याचे समोर आले आहे. काही कार्यकर्ते बंगाल वरून, काही कार्यकर्ते उत्तर प्रदेश तर काही कार्यकर्ते बिहार येथून येत असल्याचे समोर आले आहे. आम्हाला फिरायला मुंबईला चला म्हणून ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं. पण, आम्ही कुठे चाललोय हे माहितच नाही असेही या मजूरांनी सांगीतले. शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पुण्यातून पर राज्यातील कामगारांना घेऊन घेऊन ट्रॅव्हल्स निघाल्या असल्याचे समजते.

दरम्यान, अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. ” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन. माझी मुलं ही माझी मुलं आहेत म्हणून माझे उत्तराधिकारी नसतील तर जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्या आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीवरून निशाणा साधणार हेच या ओळी सांगत आहेत.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटनंतर नेटिझन्सनी एकावर एक असे ट्विट करून त्यावर प्रतिउत्तर देतं आहेत. नेटिझन्सच्या प्रतिक्रियांमध्ये मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्षरशः खिल्ली उडविण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde made one tweet before Dasara Melava check details 05 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या