3 May 2025 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

परिस्थतीमुळे लॉकडाऊन निर्णय झाल्यास सहकार्य करावं | मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

CM Uddhav Thackeray, phone call, Raj Thackeray, Corona Pandemic

मुंबई, ४ एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात समोर येत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांनी बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.

‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे, राज्य सरकार आज लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करत राज्य सरकारने जर लॅाकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यांना मनसेने सहकार्य कराव असं म्हटलं आहे.यासंबंधी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना म्हणाले की , राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.

त्यामुळे आज जी कॅबिनेटची बैठक होत आहे त्यानतंर महाराष्ट्रात लाॅकाडऊन घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे.हा लॅाकडाऊन मर्यादित कालावधीसाठी केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing day by day. The state is on the verge of lockdown as Maharashtra alone has the highest number of patients across the country. The Chief Minister has called an emergency meeting today to take a decision in this regard. Earlier, Uddhav Thackeray had phoned his brother and MNS president Raj Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray phone call to MNS president Raj Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या