25 July 2021 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या

BMC Nair Hospital, Covid 19 Patients

मुंबई, ६ जून: मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती पण त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला या रुग्णालयात ठेवले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मृत रूग्ण हे माहीम परिसरात राहत होते. ३१ मे पासून कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तरी पण त्यांना सर्दी आणि तापअसल्यामूळे रुग्णालयातच ठेवले होते.

त्यांची दुसरी चाचणीही केली आहे. पण तो रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याआधीच त्यांनी रुग्णालयातील बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या हत्या केली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाथरूमचा दरवाजा बराच बंद दिसल्याने रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी बाथरूमचा तोडला. त्यावेळी त्यांना आतमध्ये या रुग्णाने टॉवेलने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लक्षणे असल्याने ते मानसिक तणावाखाली होते.

दरम्यान काही ठिकाणी कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती बिघडताना दिसत आहे. कारण मुंबई अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स इस्पितळात एका ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने फास लावून आत्महत्या केली होती. असं असलं तरी त्या रुग्णाच्या आत्महत्येचं मूळ कारण अजून समोर आलेलं नाही.

 

News English Summary: A 43-year-old patient with corona symptoms has committed suicide by hanging himself in a bathroom at Nair Hospital in Mumbai. The patient’s corona test was negative but he was admitted to the hospital as he was showing symptoms of corona.

News English Title: Patient with Corona symptoms commits suicide in Nair Hospital bathroom News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1388)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x