2 May 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोनाबाधित रुग्णाला एकच दिवस क्वारंटाइन ठेवलं; जमावाची मुख्याधिकाऱ्यावर चप्पलफेक

Corona patient, quarantined, Kanya Vidyamandir school, only one day

कागल, ४ जून : मुरगूड शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोना बाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे. पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला. या ठिकाणी प्रचंड गोंधळ झाला. पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संपूर्ण पालिकाच क्वारंटाईन करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी झालेल्या घोषणाबाजीत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावर नागरिकांनी चप्पलफेक केली.

प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप संतापलेल्या नागरिकांनी यावेळी केला. या घटनेवरुन मुरगुडमधील वातावरण तापले असून मुरगुड पालिका कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. काही वेळात या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरु झाला. दरम्यान संतप्त नागरिकांनी पालिकेतील काही बॅनर फाडून भिरकावले. संपूर्ण पालिका, स्वच्छता कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली.

यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड नगराध्यक्ष राजस्थान जमादार यांचा धिक्काऱ्याच्या घोषणा नागरिकांनी यावेळी दिल्या. तर काही नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या दिशेने चप्पल फेकली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला केला. पण त्या वेळी नागरिकांनी पोलिसांना तुम्ही सांगू नका आमच्या जीवाशी खेळता काय असा सवाल केला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात नागरिकांना पालिकेतून बाहेर काढण्यात आले. यावेळी बाहेर नागरिक प्रचंड घोषणाबाजी करत होते.

 

News English Summary: The first corona-infected 20-year-old patient found in Murgud city on Wednesday has been documented by the administration as an institutional quarantine. But in reality, the patient was quarantined in Kanya Vidyamandir school for only one day.

News English Title: Corona patient was quarantined in Kanya Vidyamandir school for only one day News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या