26 April 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ई-पास सुरु राहणार की बंद करणार | राज्य सरकारची भूमिका स्पष्ट

Coronavirus, Minister Vijay Wadettiwar, E-Pass

नागपूर, २५ ऑगस्ट : राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्या तरी ई- पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात करोना रुग्णवाढीमुळे काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अनलॉक – 4 लागू करण्यात आलं आहे. अनेक मॉल आणि दुकाने नियमांचा अवलंब करीत खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरनंतर अनलॉक -5 सुरू होईल. यादरम्यान शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जात होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार देशात अद्यार शाळा सुरू करण्यात येणार नाही. नव्याने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही सध्या तातडीने शाळा सुरू होणार नसल्याचे दिसत आहे.

 

News English Summary: The state needs to continue e-pass for some more time. Therefore, the government has no plans to close e-pass at present, said Vijay Vadettiwar, the state’s disaster management minister. He was speaking in Nagpur.

News English Title: Coronavirus Congress minister Vijay Wadettiwar On E Pass In Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x