सौरव गांगुली भाजपच्या वाटेवर ? | प. बंगालच्या मैदानात उतरण्याची चर्चा
प. बंगाल, २५ ऑगस्ट : पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचे यासाठी भाजपची मंडळी आतापासूनच कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खरा सामना सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी शहा यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.
ममता बॅनर्जी यांना विरोध करणारा सर्वमान्य चेहरा आज तरी या राज्यात भाजपकडे नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार त्यामुळे भाजपकडून जाहीर करण्यात येत नाही. मात्र भाजपने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. गांगुली हा भाजपमध्ये थेट प्रवेश करणार असल्याचे समजते.. बंगाल न्यू टाऊनमध्ये शाळेसाठी ममता बॅनर्जी यांच्या सरकारने दिलेली दोन एकर जमीन गांगुली याने परत केली आहे. त्याने हा निर्णय अचानक का घेतला ? हा ही प्रश्न आहे.
2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी गांगुलीला मैदानात उतरविण्याची भाजपची तयारी सुरू असल्याची चर्चा माध्यमातून सुरू असली तरी स्वत: गांगुलीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांने शाळेसाठी सरकारने दिलेली जमीन परत केली आहे. गांगुलीच्या या निर्णयामुळे तो राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार सुरू झाली आहे. गांगुली याने क्रिकेट मैदान गाजविले आहे. एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांने क्रिेकेट सोडले नव्हते. तसेच सामाजिक कार्यातही तो सक्रिय होता. पश्चिम बंगालमध्ये तो शाळा सुरू करणार होता त्यासाठी ममता बॅनर्जी सरकारने त्याला जमीनही दिली होती. मात्र आता ती जमीन त्यांने परत केली आहे. जर गांगुली राजकारणाच्या मैदानात उतरला पश्चिम बंगालचे राजकारणही ढवळून निघू शकते.गांगुली कमळ हाती घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा, टीव्ही 9सह इतर वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.
News English Summary: The rumors regarding former India skipper and current BCCI president Sourav Ganguly joining BJP is going to be fuelled further after the legendary cricketer reportedly returned a piece of land that was given to him to build a school in Kolkata’s rapidly developing eastern metropolis, New Town.
News English Title: Former Indian Cricketer Sourav Ganguly path BJP discussion landing West Bengal Election News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News