2 May 2025 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

वेदांता प्रकल्पाची कोणती चिठ्ठी मुख्यमंत्री शिंदेंनी विधासभेत वाचलेली हा संशोधनाचा विषय, आता फडणवीस आणि कदमांच्या अजब मागण्या

Vedanta Foxconn Project

MLA Santosh Bangar | देशात सामान्य लोंकांसाठी महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे झाले आहेत. दुसरीकडे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच वेंदांता सारखा १ लाख लोकांना रोजगार देऊ शकेल असा प्रकल्प तडकाफडकी गुजरातला गेल्याने तरुणांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.

तळेगावात जनआक्रोश मोर्चा  :
त्यालाच अनुसरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार म्हणून पुन्हा एकदा हिणवलं. “मुख्यमंत्र्यांनी एक-दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता.

एका चिठ्ठीचा पुरावा दाखवा :
मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता. एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकता का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला. काहीतरी मनात येईल,ते बोलता. अडीच वर्षे सत्तेवर होतात. त्या काळात त्यांनी काहीच केलं नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

अडीच वर्षात केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम यांनी केलं. आता मनात येईल ते बोलता. साधी चिठ्ठी तर दाखवा की, मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात मंजूर झाला होता नि मग तो दुसरीकडं गेला. रोज बोलायचं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं यानं महाराष्ट्र कधीचं पुढं जाणार नाही. आम्ही हिमतीनं महाराष्ट्रात गुंववणूक आणली, यापुढंही आणून दाखवू, असा सज्जड दम फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. तसेच दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंवर थेट कागदपत्रांची मागणी केली आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम कदम यांच्या मागण्या हास्यास्पद म्हणाव्या लागतील कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वतः काही कागदपत्रं वाचत थेट विधासभेत वेंदांता प्रकल्पाबद्दल राज्यात येतं आहे हे आकडेवारी सहित जाहीर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ पाहिला तरी चौकशी कोणाची व्हायला हवी याचा अंदाज येऊ शकतो. कारण माहिती राज्याच्या सभागृहात म्हणजे थेट विधानसभेत ऑन रेकॉर्ड दिली गेली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis demanded papers from Aaditya Thackeray check details 25 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Foxconn Project(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या