3 May 2025 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

भाजपच्या जडणघडणीत चंद्रकांतदादांचं योगदान शून्य - एकनाथ खडसे

knath Khadse, BJP State President Chandrakant Patil

मुंबई, १३ मे: “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकिट का नाकारण्यात आलं याची कारणमीमांसा केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

पुढे ते म्हणाले की, कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.

दरम्यान, खडसेंनी पुन्हा पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेमधून पक्षात आले. त्यांना पक्षाचा इतिहास माहीत नाही. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान शून्य असल्याचं खडसे म्हणाले.

 

News English Summary: Eknath Khadse again fired BJP State President Chandrakant Patil. Said Chandrakantdada came to the party from the student council. They do not know the history of the party. Eknath Khadse said that his contribution to the formation of the party was zero.

News English Title: Eknath Khadse again fired BJP State President Chandrakant Patil News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या