Ganeshotsav 2020: सुखकर्ता दु:खहर्ता..! लाडक्या बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन

मुंबई, २२ ऑगस्ट : १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच शनिवारपासून गणेशोत्सवाच्या Ganeshotsav 2020 मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.
मागील बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांनीच आता मोठ्या मनोभावे आपआपल्या घरात, काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठातपना केली आहे. तर, काहींनी मनोभावे या गणरायाला साकडं घालत ‘बा गजानना हे संकट दूर कर’, अशी विनवणी केली आहे.
संपूर्ण देशात आणि अर्थातच परदेशातही अतिशय मंगलमय अशा या पर्वाची सुरुवात झाली आहे. असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाची आरती करण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं या क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला सुरेख अशा चाफ्याच्या सुवासिक फुलांचा साज चढवल्याचं पाहायला मिळत आहे. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप सारी संकटं दूर करण्यासाठीच जणू सज्ज झालं आहे हे या मंगलमूर्तीकडे पाहयताना जाणवत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडूनही नियमांचं पालन करत शिस्तबद्दपणे गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो”.
आप सभी को गणेश चतुर्थी की बहुत-बहुत बधाई। गणपति बाप्पा मोरया!
Greetings on the auspicious festival of Ganesh Chaturthi. May the blessings of Bhagwan Shri Ganesh always be upon us. May there be joy and prosperity all over.
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2020
News English Summary: Every year on Ganesh Chaturthi, when ‘Mumbai cha Raja’ is brought to Ganesh Gully, in Mumbai’s Lalbaug area, the idol is welcomed by huge crowds of the faithful and deep-throated chants of “Ganpati Bappa Morya”. Not this year. On Friday, a day ahead of Ganesh Chaturthi, the festival that kicks off the 10-day Ganeshotsav celebrations, the pandal is almost deserted, except for a few volunteers and workers milling around in masks.
News English Title: Ganeshotsav 2020 Aarti being performed at the Shri Siddhivinayak Temple in Mumbai on Ganesh Chaturthi watch video News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC