30 April 2025 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा
x

Vihir Anudan Yojana | नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेतून मिळवा अनुदान

new wells and old wells apply online

मुंबई, 29 मार्च | शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवणे झाली आहे.

या योजनेअंतर्गत नवीन विहीर तयार करण्याकरिता अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होते, तसेच जुन्या विहिरीचे नूतनीकरण करणे किंवा दुरुस्ती करण्याकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, इन वेल बोरिंग 20 हजार, पंप संच 20 हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख व सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, संच 50 हजार किंवा तुषार सिंचन संच 25 हजार पीव्हीसी पाईप 30 हजार, परसबाग 500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटला भेट द्या .
  • उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय उपलब्ध असेल तिथे पर्यायावर क्लीक करा तो तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा.
  • शेतकरी योजना हा पर्याय निवडा. मग पर्याय निवडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ यावर क्लिक करा.
  • या योजनेबाबत अनुदान पात्रता या सर्वांची माहिती दिसेल.
  • उजव्या कोपऱ्यात नवीन ‘अर्जदार नोंदणी’ (Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर अर्ज करण्याकरिता अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा. लॉगिन प्रकार निवडून वापर ‘कर्ता आयडी’ किंवा ‘आधार क्रमांक’ (Aadhaar Number) टाका.
  • त्यानंतर ‘प्रोफाईल स्थिती’ (Profile Status) हे वेब पेज ओपन होईल. तिथे ‘अर्ज करा’ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होइल त्यामध्ये शेवटचा पर्याय अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना (Special scheme for farmers) या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे उजव्या कोपऱ्यात बाबी निवडा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
  • घटक निवडा या पर्यायावर तुम्हाला हवा तो ऑप्शन निवडा किंवा तुम्हाला कोणत्या कामाकरिता अनुदान हवे आहे, तो पर्याय निवडा उदाहरण: जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, ठिबक सिंचन संच, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यास अस्तरीकरण, (Lining the farm) नवीन विहीर इ. एक वेळेला एकच पर्याय निवडू शकता.
  • त्यानंतर जतन करा पर्यायवर क्लीक करा. Ok बटन वर क्लीक करा.
  • यानंतर तुम्हाला सोडत पद्धतीने म्हणजे लॉटरी पद्धतीने तुमचे नाव जाहीर होईल नाव जाहीर झाल्यास कागदपत्रे जमा करा. अर्ज करण्याकरिता कागदपत्रांची आवश्यकता नसते.

पात्र असणारे जिल्हे:
ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते परंतु मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या