राज्यातील प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात

मुंबई, ९ जून : राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, विविध राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५० स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात करण्यात आली आहेत. कोरोनाचं व्यवस्थापन, कंटेंन्मेंट धोरण यासाठी तांत्रिक मदत आणि इतर व्यवस्थापनासाठी या समित्यांकडून मदत केली जाणार आहे. या ५० ठिकाणच्या स्थानिक प्रशासनावर अत्यंत मोठा भार असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला.
महाराष्ट्र ७ (जिल्हे आणि महापालिका), तामिळनाडू ७, तेलंगणा, ४, राजस्थान, ५, आसाम ६, हरियाणा ४, गुजरात ३, कर्नाटक ४, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ५, पश्चिम बंगाल ३, दिल्ली ३, बिहार ४, उत्तर प्रदेश ४ आणि ओदिशामध्ये ५ पथकै तैनात करण्यात आली आहेत. या तीन जणांच्या प्रत्येक पथकामध्ये दोन तज्ञ आणि एक वरिष्ठ संयुक्त सचिव यांचा समावेश आहे. सचिव दर्जाचा अधिकारी प्रशासकीय व्यवस्था पुरवण्यासाठी नोडल अधिकारी असेल. केंद्राची पथकं प्रत्यक्ष काम करणार असून कोविड सेंटरसारख्या विविध सुविधांच्या ठिकाणी भेटी देतील आणि नियोजनासाठी राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करतील.
योग्य समन्वय, तातडीची कार्यवाही आणि कणखर धोरणासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकांना या पथकांच्या सातत्याने संपर्कात रहावं, असंही प्रस्तावित करण्यात आलं आहे. कारण, या पथकांचा थेट राज्य सरकारशी संपर्क असेल आणि त्यामुळे योग्य ते नियोजन होण्यास मदत होईल, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
News English Summary: High level teams of the Center have been deployed in 15 States and Union Territories with the help of 50 local district administrations and Municipal Corporations. These committees will provide technical assistance for corona management, content policy and other management.
News English Title: High level teams of the Center have been deployed in Maharashtra to help local district administrations and Municipal Corporations News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER