28 July 2021 6:25 PM
अँप डाउनलोड

Unlock 5 | हॉटेल, उपहारगृहं, बारसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

Hotel Restaurants Bar, New SoP, Guidelines Unlock 5, Maharashtra Government

मुंबई, ३ ऑक्टोबर : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेटस्, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे नियमावली ?

 • उपहारगृहांचा दरवाजा कर्मचाऱ्यांपैकीच कोणी उघडावा.
 • प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग केली जावी. ग्राहकाला करोनाची लक्षणं आहेत का नाही याची पडताळणी व्हावी.
 • कोणतीही लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा.
 • ग्राहकांना सेवा पुरवताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं.
 • हॉटेल, उपहारगृहांमध्ये आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी.
 • कोणत्याही ग्राहकांना मास्क शिवाय परवानगी दिली जाऊ नये. केवळ अन्नपदार्थांचं सेवन करताना मास्क काढण्याची परवानगी असेल.
 • ग्राहकांना शक्यतो मास्क, ग्लोव्ह्ज आणि इंन्स्टन्ट हँटवॉश आणण्याचा आग्रह करावा.
 • प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझरची सोय करण्यात यावी.
 • पैसे स्वीकारण्यासाठी जास्तीतजास्त डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात यावा.
 • पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीनं सातत्यानं सॅनिटायझरचा वापर करावा.
 • शौचालय किंवा हात धुण्याच्या जागेची वारंवार पडताळणी करण्यात यावी. त्या ठिकाणी कायम स्वच्छता ठेवावी.
 • कर्मचारी आणि ग्राहक यांच्या शक्यतो कमी संपर्क असावा.
 • सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
 • मुंबई हॉटेल उपहारगृहं सुरू झाल्यानंतर जाण्यापूर्वी आपली नोंदणी करणं आवश्यक असेल.
 • ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा.
 • दोन टेबलांमध्ये सुरक्षित अंतर असावं.
 • टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं आवश्यक आहे.
 • कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अथवा करोनाची चाचणी करणं आवश्यक असेल. गरज भासल्यास करोनाच्या मदत संपर्क केंद्रावर संपर्क साधावा.
 • बसण्यापूर्वी टेबलवर कोणत्याही प्लेट, ग्लास, मेन्यू कार्ड, टेबल टॉबल टॉप अथवा कोणत्याही वस्तू असू नयेत. कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा.
 • क्युआर कोडच्या स्वरूपात मेन्यू कार्ड देण्याचा प्रयत्न करावा.
 • सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जमिनीवरही खुणा करण्यात याव्यात.
 • शक्यतो एसीचा वापर टाळावा. आवश्यकता असल्यास सतत त्यांची सफाई करत राहावी.

 

News English Summary: Public life in the state is slowly coming to a standstill under Mission Begin Again. The lockdown has been extended again till October 30 in view of the increasing prevalence of corona. Hotels, restaurants and bars that have been closed for the past six months during the Unlock 5 phase will now reopen. The state government has announced regulations for the reopening of restaurants, bars and hotels.

News English Title: Hotel Restaurants Bar New Sop Declared Maharashtra Government Covid 19 Situation Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1388)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x