2 May 2025 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

लॉकडाउन नव्हे | तर परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे सरकारचे संकेत

Maharashtra, No Lockdown, Stricter conditions, corona pandemic

मुंबई, ३० मार्च: महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना काल धुळवडी दिवशी मात्र रूग्णसंख्येत घट झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात तब्बल ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते.त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीच्या तुलनेत आज मात्र रूग्णसंख्येत घट झाल्याने महाराष्ट्रासाठी समाधानकारक बाब आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आता संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहील. परंतु, रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. ५० टक्क््यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियम न पाळता डोंबिवली येथे 27 मार्च रोजी आंदोलन केल्यामुळे तब्बल 125 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, रविवार बंदचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी हे व्यापारी आंदोलन करत होते. प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरुन डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: In Maharashtra, the government has now signalled to impose stricter conditions to control crowds in public places instead of a total ban. According to state government officials, suburban rail traffic will continue for the time being. However, restaurants, malls, public places, private offices and pubs will be subject to stricter restrictions.

News English Title: Instead of a total ban Maharashtra govt signalled to impose stricter conditions due to corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या