30 April 2025 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

पवारांना वारंवार मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नव्हे

Sharad Pawar, Matoshri, Chandrakant Patil

मुंबई ७ जुलै: भाजपने यावरून मातोश्री दौऱ्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थितीसह विविध मुद्यांवर भूमिका मांडली. त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या सरकार अस्थिरतेच्या चर्चांवरही भाष्य केलं. सरकार पाच वर्ष काम करेल या संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना पाटील म्हणाले,”कोण म्हणतंय तुमचं सरकार पडणार आहे म्हणून… दोन मित्र अंधारातून जात असताना एकमेकांना धीर देतात. भूत बित काही नाही बरका. असंच सध्या चाललंय,” असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. त्या भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात होते. या बहुचर्चित भेटीवर शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिल्यानंतर त्या स्थळापासून मातोश्री जवळच होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आपण गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला.

 

News English Summary: BJP state president MLA Chandrakant Patil drew the attention of Chief Minister Uddhav Thackeray, repeatedly saying that it was not appropriate to bring time to force Pawar to help Matoshri.

News English Title: It is not right to bring time for Sharad Pawar to round on Matoshri said Chandrakant Patil News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या