बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात अडथळे, मुस्लिम धर्मियांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई, ३० जुलै : मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद हा सण १ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याच वेळी महापालिकांनी काही नियमावली जाहीर केली आहे.
संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मस्जिद वा अथवा सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता घरीच नमाज अदा करावी, जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची झाल्यास ऑनलाइन पद्धतीने वा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानीवर भर द्यावा. पालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. त्यात कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे महाविकास अघाडी सरकारने आमचा अपेक्षा भंग केला आहे. बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत आहे. हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा मुंबईतील मुस्लिम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी दिला आहे. हांडीवाली मशिदीचे इमाम मौलाना ऐजाज कश्मीर यांनी म्हटले आहे, की पोलिसांनी जेथे वाहने अडवली, तेथे त्यांचे मुस्लीम सहकारी गेलेदेखील, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. माजी मंत्री नसीम खान म्हणाले, इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाइन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर मौलानांनी निशाणा साधला आहे. “सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत,” असे मोलानांनी म्हटले आहे. संबंधित मोलानांनी आपोर केला आहे, की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने सीमेवर अडवले जात आहेत. त्यांना चेकपोस्टवरून आत येण्यापासून रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत. यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास होत आहेत.
तसेच देवनारच्या कत्तलखान्यात रोज म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. ‘यापूर्वीचे फडणवीस सरकार प्रत्येक सणापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारने, अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही,’ असेही शेख म्हणाले.
News English Summary: The government has failed to meet our expectations ahead of Mahavikas aghadi. The government is obstructing the sacrifice of animals on the occasion of Bakri Eid. If this does not stop, we will agitate, warned Muslim activists and some clerics in Mumbai.
News English Title: Maharashtra government hurdles in sacrifice for Bakri EID Muslims warned agitation News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC