27 July 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाहीत | लस आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर शाळांचा विचार - उपमुख्यमंत्री

DCM Ajit Pawar

मुंबई, २४ सप्टेंबर | देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप असल्याने अद्याप सर्व शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने आता सरकार सर्व शाळा सुरु करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल.

लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाहीत, लस आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर शाळांचा विचार – Deputy CM Ajit Pawar talked about schools reopen in state :

कोरोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यात येत आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. कोरोनाची सद्यस्थिती परिस्थिती काय आहे, तिसऱ्या लाटेचे काही संकेत आहेत का, 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे आहे. त्यानंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, विचार होईल. तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांची मते विचारात घेतली जातील, असे पवार म्हणाले.

लहान मुलांच्या लसी अजून आलेल्या नाहीत. लसी आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमचा आमचा विचार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Deputy CM Ajit Pawar talked about schools reopen in state.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x