2 May 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रात २७३९ नवे कोरोना रुग्ण, १२० मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ६ जून: राज्यात आज दिवसभरात २७३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत राज्यात २९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज २२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ४२ हजार ६०० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. आज राज्यात २७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ८२ हजार ९६८ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.६ टक्के इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.५७ टक्के इतका झाला आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २९ हजार ९८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आज १२० करोना रुग्णांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ७८ पुरुष होते तर ४२ महिला होत्या.

 

News English Summary: The state has seen an increase of 2739 new corona patients in a day today. So 120 corona patients have died in a day. 2234 patients have been cured in the state. So far, a total of 37,390 coronary arthritis patients have been cured and released at home.

News English Title: Maharashtra state has seen an increase of 2739 new corona patients in a day today News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या