20 August 2022 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

Corona Crisis, Covid19, CM Uddhav Thackeray, DCM Ajit Pawar

मुंबई, ०९ एप्रिल: आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही कपात होणार आहे.वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर आमदारांच्या वेतनातही कपात केली जावी, असा विचार राज्य पातळीवर सुरू झाला होता. त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब यांचा समावेश असेल.

 

News English Summary: Maharashtra Cabinet approves 30% deduction in MLA’s salary The deduction will take place from April. This decision has been taken for the year. The Maharashtra government has now taken this decision following the Center. The central government had said that the state government should take the decision of the state government. Now, the Maharashtra government has approved the Thackeray government’s deduction for MLAs. The funds saved will be used to deal with Corona.

News English Title: Story Maharashtra cabinet has approved a proposal for 30 percentage salary cut for all state legislators for a year starting from this month Covid19 Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x