2 May 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

अमरावतीत आम्ही हरलो, ती आमची जागा नव्हती | ती जागा नेहमी अपक्षच जिंकतात - अनिल परब

Minister Anil Parab, Amaravati MLC seat, BJP, MahaVikas Aghadi

मुंबई, ४ डिसेंबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे राषअट्रवादी आणि कॉंग्रेस जल्लोष करत आङेत तर दुसरीकडे भाजप हार झाल्याने पुढे काय या प्रश्नात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जरी स्वत:ची हार स्वीकारली असली तरी शिवसेनेला आणि ठाकरे सरकारला टोला लगावणे बंद केले नाही. अमरावतीच्या जागेवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावत, ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकही जागा जिंकता आली नसल्याचं म्हटलं होतं.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी ट्विट करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा पराभव मान्य केला. ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून नितेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

याचदरम्यान आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी यासंदर्भात संवाद साधताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, आजचा विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले. अमरावती ही जागा आम्ही हरलो, पण ही जागा आमची नव्हती. अमरावतीची जागा ही नेहमी अपक्ष जिंकत आले आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन करावे. अनेक वर्षे जिंकणाऱ्या दोन जागेवर ते हरले आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

 

News English Summary: Transport Minister and Shiv Sena leader Anil Parab has hit out at the Bharatiya Janata Party. Talking to media in this regard, Transport Minister Anil Parab said that today’s result of the Legislative Council was that the rickshaw lost the bullet train. We lost this place in Amravati, but this place was not ours. Independents have always won Amravati seats. The Bharatiya Janata Party should introspect rather than tell us. Anil Parab has claimed that they have lost two seats which they have won for many years.

News English Title: Minister Anil Parab reply over Amaravati MLC seat lost news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या