13 August 2022 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

खडसेंचा प्रवेश | राष्ट्रवादीत अंतर्गत कलह | आव्हाडांचं मंत्रिपद जाणार? त्या बदल्यात...

Minister Jitendra Awhad, Eknath Khadse

मुंबई, २३ ऑक्टोबर: मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी प्रवेश करण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. खडसे यांना राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते दिले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सध्या हे खाते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. मंत्रीपद जाणार म्हणून आव्हाड नाराज असल्याची चर्चा आहे. आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खडसेंच्या प्रवेशाआधी तासभर चर्चा केली. या चर्चेतून तोडगा निघाला की नाही हे अद्याप समजलेले नाही.

खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कृषीमंत्री केले जाणार अशी चर्चा आधी सुरू होती. मात्र कृषी मंत्रालय शिवसेनेच्या दादाजी भुसे यांच्याकडे आहे. सेना कृषी मंत्रालय देण्यास तयार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे असलेले गृहनिर्माण खाते खडसेंना देण्याची तयारी करत आहे. या बदल्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्याची तयारी सुरू आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री अशी दोन पदे आहेत. यापैकी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यास ते तयार असल्याचे वृत्त आहे.

 

News English Summary: Even before Eknath Khadse entered, an internal quarrel has started in the NCP. Talks are rife that Khadse will be given a housing account with the NCP. This account is currently with Jitendra Awhad. There is talk that Awhad will be unhappy as he will be leaving the ministry. Awhad had an hour-long discussion with NCP president Sharad Pawar before Khadse’s entry. It is unknown at this time what he will do after leaving the post.

News English Title: Minister Jitendra Awhad may leave his ministry after Eknath Khadse in NCP News updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x