मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा सोमवारी दुपारी १ वाजता विधान भवनाजवळ शपथविधी होईल. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. शिवसेनकडून अनेकांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या वाट्यातील मंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त आहे आणि तशी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आल्याचं समजत.

 

Web Title:  MLA Bachhu Kadu will take Oath of cabinet Minister today.

शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या आ. बच्चू कडूंना शिवसेनकडून मंत्रिपद