अमरावती, १७ ऑगस्ट | वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.
काय आहे प्रकरण:
सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या यशोगाथाचे काम 27 फेब्रुवारी 2013 रोजी सुरू होते. त्यावेळी देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेवून सभागृहात आले व जोरजोरात बोलू लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. दरम्यानच मला त्यांनी अर्वाच्च भाषेत आईवरुन शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली व माईक फेकून मारला, अशी आशयाची तक्रार वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांनी वरूड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून देवेंद्र भुयार यांच्यावर भादंविच्या 353, 186, 294, 506 गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती दोषारोपपत्र 15 एप्रिल 2013 रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणाचा तपास पीआय दिलीप पाटील यांनी केला.
उच्च न्यायालयात दाद मागणार:
2013 मध्ये झालेल्या एका प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल मान्य आहे. या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MLA Devendra Bhuyar jailed for three months news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		