मुंबई : पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान विरोधकांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं काढलेल्या मोर्च्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील खिल्ली उडवली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या पीकविमा मोर्चा संदर्भात बच्चू कडू यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांनी पुणे येथील कार्यक्रमात बोलताना ‘शिवसेनेचे नेते हे विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढत आहेत. मात्र सरकारमध्ये असताना ते शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?’ असं म्हणत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली केली. तसेच पुढे बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान झाले आहे मात्र अनेक दिवस झाले तरी सुद्धा पिकविम्याचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी मोर्चा, मग शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळात झोपा काढतात का? : आमदार बच्चू कडू