मुंबई : हिंदी भाषेवरून दक्षिणेच्या राज्यातील नेत्यांकडून अत्यंत कडवट प्रतिक्रया येत असताना महाराष्ट्रात देखील हा विषय पेट घेण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्ताव देणारया ‘राष्ट्रीय शिक्षा निती २०१९’च्या मसुद्यावरून दिवसेंदिवस वाद चिघळत चालला आहे. देशभरातील गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव देण्याच्या या मसुद्याला तामिळनाडूमधून कडाडून विरोध करण्यात येतो आहे नि त्याविरोधात दक्षिणात्य नेत्यांच्या अत्यंत तिखट प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्यावर आक्रमक झाली आहे.

हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका’ असे मत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मांडले असून मनसे अधिकृतद्वारे ते ट्विट करण्यात आले आहे. हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. तसेच ‘हिंदी इमपोझिशन’ असा हॅशटॅग मनसेकडून ट्विटमध्ये वापरण्यात आला आहे. तत्पूर्वी रविवारी केंद्र सरकारने या मुद्दावर आपला बचाव करताना हिंदी भाषा कोणत्याही राज्यावर थोपविणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. राष्ट्रीय शिक्षण नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत. हिंदी भाषा महाराष्ट्रात शिकविण्याच्या मुद्दावर सर्वप्रथम तामिळनाडूमधून विरोध दर्शवण्यात आला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तमिळमध्ये ट्विट केले होते. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील शिक्षा नीतीच्या मसुद्याचा अभ्यास, विश्लेषण आणि चर्चा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दक्षिणात्य नेत्यांच्या हिंदी भाषा विरोधानंतर महाराष्ट्रात मनसेचा हिंदी भाषेवरून संताप