14 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली | पेज-३ नेत्यांना झटका - मनसे

MNS leader Sandeep Deshpande, Aaditya Thackeray, Tesla plant, Karnataka

मुंबई, १३ जानेवारी: अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास ऑफिस असेल, अशी माहिती आहे.

दरम्यान बहुचर्चित टेस्ला कंपनी महाराष्ट्राऐवजी बेंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टेस्ला टीमशी झालेल्या चर्चेत आदित्य ठाकरेंनी टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती.

त्यालाच अनुसरून आदित्य ठाकरेंच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना संदिप देशपांडे यांनी, “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असं ट्विट करत आदित्य यांना लक्ष्य केलं.

 

News English Summary: American car company Tesla has finally entered India. Veteran businessman Alan Musk had hinted at this several times before on Twitter. Now the wait is finally over. Tesla has registered in India on January 8. Tesla has chosen Bangalore to start its office. Tesla will have its office at Richmond Circle Junction in Bangalore. It is learned that the company will have a research and development office at this place.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande criticised minister Aaditya Thackeray over Tesla plant in Karnataka news updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x