26 April 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? | त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

BJP State president Chandrakant Patil, Minister Jayant Patil, joining BJP

पुणे, १ डिसेंबर: “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भारतीय जनता पक्षात दिसले असते”, असा दावा त्यांनी केला होता. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

“महाविकास आघाडीची सत्ता नसती तर जयंत पाटील भारतीय जनता पक्षात येणार होते. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुद्धा झाली होती. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे, ती मी तिथेच जाऊन उघड करणार आहे. पुढचं सरकार आमचंच येणार असं जयंत पाटील सातत्याने म्हणत आहेत. कदाचित पुढील सरकारमध्ये देखील मी मंत्री असेन असं त्यांना म्हणायचं असेल, असं राणे म्हणाले होते.

त्यानंतर “मी कोणत्या भाजप नेत्यांशी चर्चा केली ते जाहीर कराच, असं आव्हानही दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते, ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे”, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.

माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असं सांगतानाच नारायण राणे यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असं आव्हानही त्यांनी राणेंना दिलं आहे.

 

News English Summary: Had it not been for the Mahavikas Aghadi government in the state, you would have seen NCP state president Jayant Patil in the Bharatiya Janata Party today, ”he had claimed. Chandrakant Patil made a suggestive statement on the same issue today. According to a journalist, will Jayant Patil really join the Bharatiya Janata Party? Asked such a question. Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil gave a suggestive answer. “I am such a normal person that I have no idea exactly what is being discussed at the top level,” he said, sidestepping the question.

News English Title: BJP State president Chandrakant Patil answer over Jayant Patil joining BJP news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x