4 May 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
x

भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला - आदित्य ठाकरे

State Environment minister Aaditya Thackeray, personal attack, BJP leader

मुंबई, १ डिसेंबर: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर एका मुलाखतीदरम्यान प्रतिउत्तर दिलं आहे. “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी उत्तम काम करत असल्याने त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. वास्तविक भारतीय जनता पक्षाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेमुळे ते वैयक्तिक हल्ला करत,” असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (State Environment minister Aaditya Thackeray talked over personal attack from BJP leader) यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या संदर्भात त्यांना एक विचारण्यात आला, ‘मागील एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, तुमच्यावर अनेक आरोप झाले यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक सोयीचं आणि योग्य असल्याचा मी विचार केला. माझं जवाबदारी तसेच कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष विचलित झालं नाही. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी मोठी तसेच दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण ५ वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही”.

“जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिलं असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात आलेलं असतं. कदातिच त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल,” असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

 

News English Summary: Maharashtra Environment Minister Aditya Thackeray has responded to personal criticism from the Bharatiya Janata Party in an interview. “Since the Mahavikas Aghadi of Shiv Sena, NCP and Congress is doing a good job, no one raised any question on it. In fact, the Bharatiya Janata Party (BJP) is attacking me personally because it is afraid of me, “said Environment Minister Aditya Thackeray. He has made this statement in an interview to Navbharat Times.

News English Title: State Environment minister Aaditya Thackeray talked over personal attack from BJP leader News updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x