चॅट अर्णबचा उघड झालाय | पोलखोल भाजपाची होते आहे - भाई जगताप

मुंबई, १७ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
त्यानंतर देशभर रिपब्लिक विरुद्ध संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “चॅट अर्णब चा उघड झालाय, पोलखोल भाजपा ची होते आहे….!!”
चॅट अर्णब चा उघड झालाय,
पोलखोल भाजपा ची होते आहे..!!#ArnabGate— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 17, 2021
News English Summary: There was an atmosphere of anger against the Republic all over the country. From this, Mumbai Congress president Bhai Jagtap has drawn the attention of the Bharatiya Janata Party. In this regard, while tweeting, MLA Bhai Jagtap has said, “Chat of Arnab has been opened, but BJP is exposed …. !!
News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised BJP over Arnab Goswami and Parthi Dasgupta Whtasapp chat leaked news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL