26 April 2024 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

राष्ट्रवादी महिला आक्रमक | पेट्रोल पंपावर मोदींच्या बॅनरखाली राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

NCP, Chool Manda agitation, petrol price

मुंबई, २७ फेब्रुवारी: सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली आहे.

दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे भाव गगनाला भिडत असतानाच नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे”, असा थेट आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे. त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल, असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. या आंदोलनात अधिकाधिक महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणींनी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: A ‘Chool Manda’ agitation will be held on Sunday (February 28) at 11 am at every petrol pump in Maharashtra advertised by Modi on behalf of the Nationalist Women’s Congress to quell the outburst of public sentiment. NCP’s women state president Rupali Chakankar has given information about this today (February 27).

News English Title: NCP Chool Manda agitation against hike in petrol price news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x