पडळकर म्हणेज बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता | आ. मिटकरींचा हल्लाबोल

मुंबई, १२ फेब्रुवारी: जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलं असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोना काळ असल्यानं त्याचं उद्घाटन हे रखडलं होतं.
शरद पवार यांच्या सारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पडळकर म्हणेज बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांचा समाचार घेतला. पडळकरांना कावीळ झाल्याने त्यांना सर्वत्र पिवळं दिसत आहे. पडळकर हे पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून ते भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. पडळकरांनी चोरासारखं पुतळ्याचं अनावरण केलं. आम्हीच होळकरांचे वारसदार असून पडळकर हे आधुनिक शिशूपाल आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी पडळकरांना भाषा नीट वापरण्यासाठी दमबाजीही केली. महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे पडळकर आहेत. महाभारतात शिशूपाल जसा चुका करत होता. तशाच चुका पडळकर करत आहेत. आपणच किती शहाणे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरद पवार उद्या पुतळ्याचं अनावरण करणार होते. पण पडळकरांनी चोरून उद्घाटन केलं, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.
यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत.
News English Summary: This statue should not be inaugurated by a corrupt and racist politician like Sharad Pawar, Ahilya Devi’s work was for Bahujan and everyone else. Gopichand Padalkar unveiled the statue in a guerrilla poem saying that the statue and our feelings should not be insulted. Hundreds of Bahujan activists from across the state were present at the event. Also, Gopichand Padalkar interacted with the media after the inauguration program, at which time he had criticized Sharad Pawar.
News English Title: NCP MLA Amol Mitkari slams BJP MLA Gopichand Padalkar after targeting Sharad Pawar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE