4 May 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

जुन्ररमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिनेश दुबे यांचं कोरोनामुळे निधन

NCP Corporator Dinesh Dubey, Died, Covid19, Junnar Pune

जुन्नर, १९ जुलै : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचसोबत पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे असा त्यांचा राजकीय प्रवास होता. माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत अपयशी झाल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे.

नगरसेवक दिनेश दुबे हे राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते होते. जुन्नरमध्ये अनेक कामात त्यांचा सहभाग होता. मागील महिन्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिनेश दुबे आंदोलनात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये गरजू लोकांना मदत करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात त्यांनी काम केले होते.

 

News English Summary: In Junnar, NCP corporator Dinesh Dubey, 58, was also infected with corona. He succumbed to his injuries at a private hospital this morning. The demise of Dinesh Dubey has caused great mourning in and around Junnar.

News English Title: NCP senior corporator Dinesh Dubey died due to corona in Junnar Pune News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या