पुणे: भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेवर जोरदार टीका केली होती. काकडे यांनी ‘काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका काकडे यांनी अजित पवारांवर केली होती.

मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. निवडणुकीच्या काळात विकासाच्या कामांपेक्षा भविष्यवाण्या सांगण्यात व्यस्त असणाऱ्या भाजप खासदार संजय काकडे यांना राष्ट्रवादीने चांगलंच सुनावलं आहे. मागच्या आठवड्यात पुण्यात झालेल्या रोकोर्ड ब्रेक पावसाने अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर अनेकांनी त्यांचे प्राण देखील गमावले असून, अनेक जण आजही बेपत्ता आहेत. पुण्यातील अशी घटना घडलेली असताना कुठेच न दिसलेले खासदार संजय काकडे अचानक अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी प्रकटल्याने राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करणारे संजय काकडे यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला आहे. चाकणकर यांनी ‘संजय काकडे तुमच्या भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा.खरं तर तुम्हा लोकांना, इतका मोठा परिवार एकत्र आहे आणि तो एकविचाराने रहातो याचेच जास्त दुःख आहे. पुण्यातील पुरपरिस्थतीत दिसले नाही कोठे??तिकडे पण बघा जरा.. असं ट्वीट केले आहे.

संजय काकडे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना जित पवार राज्यातील मोठे नेते असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर जाणं शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही परवडणार नाही असंही काकडे म्हणाले होते.

काकडे पुर परिस्थतीत दिसले नाहीत? ते भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा: रुपाली चाकणकर