14 December 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत - गुलाबराव पाटील

Mahavikas Aghadi, Shivsena, Minister Gulabrao Patil

जळगाव, १८ जुलै : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्यापासून महाराष्ट्रातील सरकार सुद्धा पडणार अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. मात्र स्वतः फडणवीसांनी देखील आम्हाला सरकार पाडण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून प्रतिकिया येतंच आहेत.

उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत,” अशा शब्दांत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात शेवटी कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीका उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशात मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ राबवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत नितीन राऊत यांना विचारलं असता दिल्लीत गेलेल्या फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीका केली आहे.

 

News English Summary: Uddhav Thackeray has become the most popular Chief Minister. Therefore, the Mahavikas Aghadi government will not fall. Leader of Opposition Devendra Fadnavis should dream of Mungerilal for the post of Chief Minister, ”said Gulabrao Patil, Guardian Minister of Jalgaon district, targeting Leader of Opposition Devendra Fadnavis.

News English Title: Shivsena leader and Minister Gulabrao Patil commented on former CM Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GulabraoPatil(8)#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x