मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य ATS ने मुंबईलगतच्या मुंब्रा तसेच औरंगाबादमध्ये धडक कारवाई करत ISISच्या तब्बल ९ हस्तकांना ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून संशयास्पद साहित्य सुद्धा आढळले आहे.
सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई तसेच औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी आतंकवाद्यांचे स्लीपर सेल छुप्या पद्धतीने कार्यरत होते. त्यानंतर त्यांच्यावर संबंधित सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर होती. त्यानंतर मागच्या २ दिवसात एकावर एक धडक कारवाई करत पहिल्यांदा मुंब्रा या ठिकाणाहून पाच तर औरंगाबादहून चार हस्तकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची सखोल चौकशी सुरु असल्याचे वृत्त आहे. त्यात त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट आणि इमेल्स तपासण्यात येत आहेत.
