1 May 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

OBC आरक्षण | नांदेड-हिंगोलीत खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

OBC

नांदेड, १५ ऑगस्ट | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे विविध ओबीसी संघटनांकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत मांडावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. दुसरीकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोरही ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाओ आंदोलन केलं.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत उपस्थित करावा. सोबतच ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी संसदेत करावी अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज नांदेडचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर 2 तास ढोल बजाओ आंदोलन केलं. त्यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली. खासदारांनी लवकर हे मुद्दे मांडले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी ओबीसी संघटनेनं दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: OBC organizations are aggressive for political reservation of OBC in Marathwada news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या