महत्वाच्या बातम्या
-
गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंची पक्षातून हकालपट्टी करावी | तृप्ती देसाईंची राज ठाकरेंना विनंती
राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महत्वाच्या अशा नवी मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. ज्या गजानन काळेंवर शहराची जवाबदारी होती तेच कौटुंबिक आरोपांमुळे अडचणीत आले आहेत आणि परिणामी मनसेच्या राजकीय अडचणीतही वाढ झाल्याचं समोर येतंय.
4 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण | आरोग्य सुविधांसंबंधित माहिती दिली
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ
आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.
4 वर्षांपूर्वी -
परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आली, म्हणाले नितीन गडकरी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींचं आरक्षण वाचवा | मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका - पंकजा मुंडेंचा इशारा
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय.
4 वर्षांपूर्वी -
BHR Scam | सुनील झंवर'सोबत माझा कोणताही संबंध नाही | माझ्या कंपन्यांचा उद्योग २०० कोटींचा - भाजप आमदार
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | नवी मुंबई मनसेच्या आंदोलनाचं सत्य मांडलं | कामगारांच्या आंदोलनानंतर ठराविक रक्कम घेतली - संजीवनी काळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
25 वर्षे शिवसेना -भाजप एकत्र होती | तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्ती | ८ महिन्यांचा काळ म्हणजे राज्यपालांचे वागणं घटनाबाह्य आहे - घटनातज्ञ उल्हास बापट
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने याविषयी सुनावणी केली आहे. जास्त काळ राज्यपाल या जागा रिक्त ठेवू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीत 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गजानन काळे प्रकरणी पोलिसांना सेटलमेंटचे आदेश? | चित्रा वाघ यांची राज्य सरकारकडे विचारणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन संशोधन संस्थेत (नागपूर) 155 जागांसाठी भरती
NRBMRI नागपूर भरती 2021. राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन संशोधन संस्था, नागपूर ने 155 विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार आपला अर्ज विहित नमुन्यात 30 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी एनआरबीएमआरआय भारतीला सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MPSC मार्फत 834 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
एमपीएससी भरती 2021. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 812 सहाय्यक प्राध्यापक गट-ब पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 02 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका | शेलारांना झापलं
भाजप आमदार आशिष शेलार कायम शिवसेनेवर कायम निशाणा ठेऊन असतात. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून शिवसेनेवर बाण डागल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलारांना नागरिकशास्त्र वाचण्याचा सल्ला देत टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उर्मिला मातोंडकरांवर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप | जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड अडचणीत | घाटंजीत एसआयटीचे पथक दाखल | तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवणार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारांकडे नियमबाह्य मागण्या | गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात डेल्टा प्लसमुळे 5 जणांनी जीव गमावला | लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात एंट्री
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात अनलॉक 3.0 सुरू होत आहे. व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस’ प्रकारामुळे आतापर्यंत राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक मुंबईचा, 2 रत्नागिरीचे, एक बीडचा आणि एक रायगडचा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे वय सुमारे 65 वर्षे आहे. यापैकी 2 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी प्रत्येकी एक डोस घेतला होता. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण 66 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER