19 July 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आली, म्हणाले नितीन गडकरी...

Bachchu Kadu

अमरावती, १४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.

‘मी गडकरींचा चाहता आहे पण’
या पत्राबाबत पालकमंत्री बच्चू कडू बोलताना म्हणाले, मी पण एक त्यांचा चाहता आहे. केंद्रात सगळ्या चांगले काम करणारे आणि प्रभावी नेते आहेत. पण उद्धव ठाकरेही तोलामोलाची आणि तितक्याच ताकदीचे नेते आहेत. उद्धव ठाकरे नक्कीच त्या पत्राबाबत काय खरे आहे, खोट आहे, हे पाहून दोघांचाही उद्देश सारखाच आहे. या सगळ्यात खरी बाजू समोर येईल, असे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

गडकरींनी उद्धव ठाकरेंना लिहीले होते पत्र:
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असंच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील,’ असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. ‘महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण यात त्वरीत हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंतीही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Bachchu Kadu reply after Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x