महत्वाच्या बातम्या
-
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारचे मला कोणते काम जास्त आवडले तर ते एकत्र येत एकमेकांची पाठ खाजवणे, अशी मिश्किल टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारच्या कामगिरीवर टोला लगावला आहे. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आदी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा
धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यात पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारला टोला लगावला. केवळ चार टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
शिवसेनेत सध्या स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष वाढत असताना शिवसेना कधीच स्वतःचा मुख्यमंत्री बनवू शकणार नाही असं राजकीय तज्ञ वारंवार बोलून दाखवत. मात्र उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर एक धाडसी निर्णय घेतला आणि भाजपाने स्वप्नातही जे पाहिलं नसेल ते सत्यात उतरवलं आहे. काळानरूप धाडसी निर्णय घेणं हे एक मोठा सद्गुण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पाहत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्यात सत्ता नाही, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते - संजय राऊत
नियोजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खंडणी प्रकरण | परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू | हायकोर्टात धाव
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तासह 28 जणांविरोधात ठाणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर खंडणीच्या पैशाचे रॅकेट चालवण्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
पतीला वाचवण्यासाठी 'फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे' | ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली - रुपाली चाकणकर
सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसूक केंद्र सरकारबद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपले पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावे लागत आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मागील २ वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरणे स्वीकारले असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, तो ठेवला जातं नाही, पण राज्यपाल त्यासाठी समर्थ आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यपाल तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन हॉस्टेलचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
HSC Exam Result | पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही - राज्य सरकार
मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण...
रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची मुंबई हायकोर्टात याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आणि पवारांमध्ये जवळीक वाढतेय का? | | ते एकत्र येतील अशीही शंका व्यक्त - सविस्तर वृत्त
राज्यात काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सुमारे 15 मिनिटे भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून पुरग्रस्तांची फसवणूक? | फडणवीसांकडून आकडेवारी देत 'हा' गंभीर आरोप
काल राज्य सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार ते दीड लाख, तर दुकानदारांना ५० हजारांची नुकसानभरपाई मिळणार आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या मदतीवरून टीका केल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या मोदी भेटीचं फलित | केंद्र सरकार घटनादुरुस्ती करणार
मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मूळ उपाय योजनांपेक्षा मराठा समाजाला भडकविण्यासाठी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचं एखादं शिष्टमंडळ तर मराठा आरक्षणावरून दिल्लीला फिरकले देखील नाहीत. तर राज्यातील भाजप खासदारांनी यासाठी पंतप्रधान मोदींकडे कोणतीही आक्रमक मागणी केल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात पंतप्रधान मोदी यांची भेट घेताना महत्वाच्या मागण्या केल्या होत्या आणि त्याच फलित मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
मंत्री असतानाही राम शिंदेंना जमलं नाही ते आ. रोहित पवारांनी केलं | कर्जत-जामखेड बस स्थानक, व्यापारी संकुलाचे भूमीपूजन
कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारले जात आहे. त्याचसोबत नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | भाजप आ. सुरेश भोळेंच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे बॅनर फाडले
जळगाव शहरातील SBI कॉलनीत आ.सुरेश भोळे यांनी पाहणी दौरा केल्यानंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामासंबंधी लावलेले विकासाचे बॅनर फाडून फेकल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. बॅनर फाडणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याने या कार्यकर्त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam Updates | MPSC ची रखडलेली परीक्षा ४ सप्टेंबरला | आयोगाकडून परिपत्रक
MPSC’तर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी चारित्र्यहननाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाईमुळे मोदी समर्थक खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक | समाज माध्यमांवर खिल्ली
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर मंत्रिमंडळात यास मान्यता देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra HSC Result 2021 | राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के | इथे ऑनलाईन पहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. HSC बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सरासरी निकालांची टक्केवारी जारी केली. त्यानुसार, बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. अर्थातच एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL