2 May 2025 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

रासप'ची भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार | यापुढे भाजपापासून अंतर

RSP chief Mahadev Jankar, BJP Maharashtra, Rashtriya Samaj Party

मुंबई, ०२ फेब्रुवारी: राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांची भारतीय जनता पक्षावरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भारतीय जनता पक्षाच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भारतीय जनता पक्षापासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी यापूर्वी आपली खदखद व्यक्त केली होती. माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला हाणला होता.

 

News English Summary: Rashtriya Samaj Party president and Dhangar Samaj leader Mahadev Jankar’s displeasure with the Bharatiya Janata Party has once again come to light. As part of this, Jankar has withdrawn from the BJP’s electricity bill movement. How many days do you want to sit on the back of Bharatiya Janata Party? Saying that his party is also a national party, Mahadev Jankar has indicated that he will distance himself from the Bharatiya Janata Party in the near future.

News English Title: RSP chief Mahadev Jankar decided to keep distance from BJP party in future politics news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या